अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
भारतीय जनता पार्टी व हिंद बाल समाज मंडळ ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर संपन्न,
भारतीय जनता पार्टी व हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने भवानी पेठ भवानी माता मंदिर येथील माजी नगरसेविका मनिषा ताई लडकत यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले होते, या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे एक हजार दोनशे पंच्याहत्तर जणांनी याचा लाभ घेतला, तसेच रक्तदान शिबिरात सुमारे 90 जणांनी रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्र भेटवस्तू देण्यात आले,
यावेळी आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आदि यावेळी उपस्थित होते,
या शिबिराचे आयोजन माजी नगरसेविका मनीषाताई लडकत, आणि माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी केले होते,
