एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ताम्हीणी घाटातील बेवारस मयताच्या खुनाची ओळख पटवून वारजे माळवाडी पोलीसांनीआरोपीस घेतले ताब्यात

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

ताम्हीणी घाटातील बेवारस मयताच्या खुनाची ओळख पटवून वारजे माळवाडी पोलीसांनीआरोपीस घेतले ताब्यात.

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

वारजे माळवाडी :दि.२६जुलै २०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन अंकित कर्वेनगर पोलीस चौकी येथे पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे हे कर्तव्यावर असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, ‘कर्वेनगर मधील इसम नाव अनिकेत अनिल शिर्के याने त्याच्या सख्या भावाला ताम्हीणी घाटात मारुन टाकून दिले आहे अशी माहीती मिळताच पोलीस उप निरीक्षक सचिन तरडे, पोलीस अंमलदार गागुर्डे, कपाटे, नेवसे व ओव्हाळ असे सर्वांनी त्याचा सर्व स्तरावरती शोध सुरु केला. शोध पथकाला सदरचा इसम कर्वेनगर मधील वनदेवीव्या मागील टेकडीच्या परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोउपनि सचिन तरडे व वरील पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावून सदर इसमास ताब्यात घेवून कर्वेनगर पोलीस चौकी येथे आणले

 

 

त्यानंतर बातमीच्या अनुषंगाने त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अनिकेत अनिल शिर्के, वय २६ वर्षे, रा. गायकवाड चाळ, मावळेआळी, कर्वेनगर, पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच त्याने सांगितले की, तो व त्याचा सख्या भाऊ ऋषीकेश अनिल शिर्के, वय २३ वर्षे असे दोघेजण दि.२५जुलै २०२५ रोजी रात्री 09:00 वा. च्या सुमारास कर्वेनगर मधून त्यांचे मुळगाव मौजे गौळवशी-शिर्केवाडी ता. लांजा जि. रत्नागिरी येथील देवाच्या दर्शनासाठी त्यांच्या दुचाकीवरुन निघाले होते. दि.२६जुलै २०२५ रोजी रात्री 12:10वा. च्या सुमारास ते दोघे ताम्हीणी घाटातील मौजे गोणवडी ता. मुळशी जि.पुणे येथे रोडच्या कडेला थांबले. त्याठिकाणी ते दोघे आपासात बोलत बसले होते. ऋषीकेश शिर्के यास दारु व गांज्याचे असलेले व्यसन सोडण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्या वादातून पहाटे 03:00 वा.च्या सुमारास अनिकेत याने ऋषीकेश याच्या वर लोखंडी हत्याराने वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने तो तेथून पळून आल्याचे चौकशी दरम्यान अनिकेत शिर्के याने सांगितले.
त्यानंतर लगेच पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे यांनी सदरची सर्व हकिकत वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश वेंडे यांना फोनद्वारे कळविली. त्यांनी लगेच फोनद्वारे पौड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गिरीगोसावी यांना माहीती कळविली. त्यानंतर श्री गिरीगोसावी यांनी श्री. प्रकाश धेंडे यांना सांगीतले की, त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हीणी घाटातील गोणवडी गावच्या हद्दीत एक अनोळखी पुरुषाची मयत बॉडी मिळून आली असून त्याची ओळख पटवण्याची तसेच पुढील कायदेशीर कारवाई चालू असल्याचे सांगीतले. त्यानंतर बेवारस बॉडीचा व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्या करीता पौड पोलीस ठाणे कडील तपास यादी शोध पथकाने प्राप्त केली. त्यातील मयताचा फोटो वारजे माळवाडी पोलीसांच्या ताब्बात असलेला इसम नाव अनिकेत शिर्के यास दाखविला असता त्याने सदरची मयत बॉडी ही त्याचा सख्खा भाऊ ऋषीकेश शिर्के याची असल्याची सांगुन त्यानेच त्याचा खुन केला असल्याचे सांगीतले. त्यानंतर पौड पोलीसांशी समन्वय साधून सदरच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नाव अनिकेत अनिल शिर्के यास पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पौड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि ३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विनाग पुणे श्री. भाऊसाहेब पठारे यांच्या नार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश बेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे, पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गागुर्डे, कपाटे, नेवसे व ओव्हाळ यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link