सायंदैनिक लोकदिशा , विशेष तपास, अजिंक्य महाराष्ट्र आणि मीडीया पोलिस टाईम मध्ये बातमी झळकताच यावल ग्रामीण रुग्णालयात दुसऱ्याच दिवशी दोन डॉक्टर हजर
(जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी )
यावल ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसांपासून एकच डोक्टर वर रुग्णांना सेवा मिळत होती या रुग्णालयात डॉक्टरांची कमी असल्यामुळे रुग्णाचे सेवाअभावी हाल होत होते याचा आढावा मीडीया पोलिस टाईम चे शहर प्रतिनिधी भिमराव गजरे यांनी घेतला आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा आँखो देखा हाल पाहुन मीडीया पोलिस टाईम आणि सायं दैनिक लोकदिशा मध्ये बातमी प्रकाशित करताच आरोग्य विभागाचे अधिकारी जागे झाले आणि त्यांनी तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दुसऱ्याच दिवशी दोन डॉक्टराना यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याने ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे ह्या यावल ग्रामीण रुग्णालयात बऱ्याच दिवसापासून डॉक्टरांची कमी असल्यामुळे बाहेर गावाहून आलेले रुग्ण व यावल स्थानिक रुग्णांना व वय वृद्ध म्हाताऱ्या महिला व पुरुष यांना त्रास सहन करावा लागत होताआणि आता हा त्रास कमी झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेत त्वरित दोन डॉक्टरांची यावल ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती केल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे
