अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मा उच्च न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत आर आर डुकरेनां सेवा निवृत्ती चा लाभ देऊ नका
प्रशांत डोंगरदिवे
प्रतिनिधी -सारंग महाजन
मा. उच्च न्यायाल्याने दिले 31 जुलै ला हजर राहण्याचे आदेश
चिखली -: येथील प स चे प्रभारी गट शिक्षण अधिकारी आर आर डुकरे यांच्या विरोधात मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल झाल्याने निकाल लागे पर्यंत आर आर डुकरे यांना सेवा निवृत्ती चा लाभ देण्यात येऊ नये असे लेखी निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथ, व लेखाधिकारी जि प बुलडाणा यांना भारतीय मानवाधिकार संघटनेचे प्रशांत डोंगरदिवे यांनी दिले आहे.
आर्थिक व राजकीय पाठबळ वापरून बोगस व बनावटी दिव्यांग प्रमाणपत्र काढून शासनाची दिशा भूल करीत पदवीधर शिक्षकाने बढती मिळवीत शिक्षण विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी असे पद भूषविले या कार्यकाळात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, करीत अनेक नियमबाह्य कामे केलेले आहे. या प्रकरणी भारतीय मानवाधिकार संघटनेचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांनी वारंवार तक्रारी केल्या वेळप्रसंगी अमरण उपोषण हि केले मात्र जिल्हा प्रशासनाने कोणताही न्याय दिला नाही. तसेच आर आर डुकरे यांच्याकडे दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा यांचे जा क्र जि रु बु दिव्यांग विभाग 9643-48/25 दि 11/04/25 नुसार आर आर डुकरे यांना कर्णबधिर दिव्यांग बोर्डामध्ये पुनर तपासणी करणे करिता उपस्थित राहणे बाबत सूचित कारणात येऊन सुद्धा ते उपस्थित राहले नाही.
तसेच रमेश रतन डुकरे पाटील यांच्याविरुद्ध नामदार दादाजी भुसे,मंत्री. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्रा राज्य, नामदार ज़यकुमार गोरे, मंत्री ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य, प्रधान साचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई व प्रधान सचिव ग्रामविकास विभाग. महाराष्ट् राज्य मंत्रालय, मुंबई यांना आमदार प्रशांत बंब,सदस्य महाराष्ट्र विधानसभा यांनी जा.क्र. /कार्या/ विका /छ.संः. /२२७६३
दि १० ०७ २०२५ नुसार तक्रार दिली होती तरी सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही.
या उलट आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करीत जि प प्रशासनाने त्यांना पूर्ण पणे वाचविण्याचे काम केले. त्या मुळे नाईलाजाने प्रशांत डोंगरदिवे यांनी मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्र 3705 दाखल केली. त्यानुसार दि 17 जुलै रोजी मा उच्च न्यायालयाने आदेश देऊन आज दि 24 जुलै ला हमदस्त नोटीस सर्व समंधितांना मिळाले आहे. त्यात दि 31 जुलै ला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 31 जुलै 2025 ला आर आर डुकरे हे सेवा निवृत्त होत असल्यामुळे न्यायाल्याने तातडीचे आदेश दिले आहे. यामुळे त्यांच्यावर न्यायालय व जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
