अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे डॉ. उद्धव शिंदे यांचे प्रतिपादन.
प्रतिनिधी -सारंग महाजन
स्नेहबंध’ तर्फे यशवंतनगर जि.प. शाळेत वृक्षारोपण
अहिल्यानगर – निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन ‘स्नेहबंध’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, यशवंतनगर, केंद्र बुऱ्हाणनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यपिका रंजना चेमटे, मीनाक्षी टकले, योगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली आहे. वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी सहभागी व्हावे.
स्नेहबंध फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत नगर शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. नगर शहरात हिरवळ करण्यास स्नेहबंध फाऊंडेशनचे काम मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्याध्यापिका रंजना चेमटे यांनी काढले.
