अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वाहनांची तोडफोड करणारे सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश, सहकारनगर पोलिसांची दमदार कामगिरी..!!
कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
सध्या पुण्यात गुन्हेगारी वाढत चांगलीच असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील चांगलेच प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्यांने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. सहकारनगर पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना पकडण्यात मिळवले आहे. पोलिसांनी सूत्रांकडून माहितीवरून काही दिवसांपूर्वी धनकवडी भागात अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी तपास करीत असताना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले, धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केली होती. या तोडफोडेत काही स्कूल व्हॅन आणि इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. आणि लवकरच या मागील संपूर्ण माहिती समोर येईल असे सांगितले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ -२ मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक ( गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकांचे स.पो.नि सागर पाटील सहा.पोउनिरी. बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे प्रदीप रेणुसे अमित पदमाळे भगत आकाश कीर्तीकर मारुती नलवाड बजरंग पवार सागर सुतकर योगेश ढोले खंडू शिंदे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.*
