अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत विशिष्ट गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकते — ॲड खांडपासोळे.
हिंगोली प्रतिनिधी श्रीहारी अंभोरे पाटील
आज 26जुलै रोजी हिंगोली येथे बालका संदर्भातून घडलेल्या गुन्ह्यांमध्ये, मृत्यूदंडा पर्यंत आता शिक्षा होऊ शकते त्यामुळे बाल न्यायालय अधिनियम २०१५ व बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण २०१२ ची अभ्यासपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन दिशा संस्थेचे प्रमुख ॲड प्रवीण खांडपासोळे ह्यांनी केले हिंगोली येथील स्व. शिवाजीराव देशमुख नगर सभागृहात आयोजित बालकांचे हक्क व सुरक्षा संदर्भात आयोजित कार्य शाळेत ते बोलत होते.हिंगोली जिल्हा पोलिस व दिशा प्रतिष्ठान ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत हिंगोली शहर आणि परिसरातील शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी,शिक्षक प्राचार्य,स्कूल बस,ऑटो रिक्षा मिनी बस, चालक,वाहक केअर टेकर,पोलिस,आर टी ओ,निमंत्रित ह्या कार्य शाळेत सहभागी झाले होते.सर्व प्रथम हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेसर ह्यांनी प्रमुख वक्ते ॲड प्रवीण खांडपासोळे ह्यांचं स्वागत केलं,तर हिंगोली शहर पोलिस प्रमुख संदीप मोदे ह्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कोकाटे ह्यांचं स्वागत केलं.आरटीओ अधिकारी अतुल बानापुरे ह्यांचं स्वागत वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक संदीप मरे ह्यांनी केलं ह्या प्रसंगी जिल्हा विशेष शाखा प्रमुख बद्रीनाथ सानप व पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व ॲड खांडपासोळे ह्यांचं स्वागत केलं.बालकांवरील अत्याचार व गुन्ह्यांचे वाढते परिणाम बघता ह्यावर आळा घालण्यासाठी कठोर कायदे झालेत त्या अन्वये बालकांच्या सर्वप्रकारच्या मानसिक,शारीरिक ,लैंगिक शोषणाच्या व्याख्या व्यापक झाल्यानं म्हणून बालकांच्या येणाऱ्या सर्वांकडून जसे शिक्षण,ने आण करणारे चालक ,वाहक,आदीं कडून अनवधानाने सुद्धा कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडत असल्यास दुर्लक्ष होऊ नये ह्यासाठी ही आयोजन असल्याचं ॲड खांडपासोळे ह्यांनी सांगून दृक श्राव्य माध्यमातून माहिती देऊन जनजागरण केले.काय करावे व काय करू नये एन केल्यास मृत्यू दंडापर्यंत होणाऱ्या शिक्षा व कायद्याची माहिती त्यांनी उपस्थिताना दिली.प्रत्येक शाळेत ह्याबाबत हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने काय करावे व काय करू नये चे भीतीपत्रके लावून सर्वांना माहिती द्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी केली.सोशल व नेचूरल जस्टिस कायद्यात सूट नाही हे लक्षात घेऊन आपण सजग रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपात जिल्हा पोलिस अधीक्षक कोकाटे ह्यांनी ह्या कार्यशाळेतून मिळालेली माहिती जतन करून त्यावर अमल करावा बालकांच्या सुरक्षा व अन्य बाबी संदर्भातील कायदे पालन करावे,बालकांची ने आण करताना कार्यशाळेत सांगितलेल्या माहिती नुसार कार्यरत रहावे अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल ते टाळावे अस आवाहन केलं.स्वागतपर प्रास्ताविक व संचालन ज्येष्ट पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी केलं आभार संदीप मोदे ह्यांनी मानले,दिशा संस्थेचे मुकेश वानखडे,बद्रीनाथ गायकवाड,पूनम महाडिक,वाहतूक शाखा,शहर पायस पोलिस स्टेशन,जिल्हा विशेष शाखेच्या अधिकारी कर्मचारी मंडळींनी यशस्विते साठी परिश्रम घेतले.हिंगोलीत प्रथमच अस आयोजन करण्यात आल्याने उपस्थितांनी जिल्हा पोलिस दल व दिशा प्रतिष्ठान च कौतुक केलं.ह्यानंतर जिल्ह्यातील तालुका मुख्यालयात अस नियोजन करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
