अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रत्नागिरी पोलीस दल हळहळले, महिला पोलिसांचा प्रस्तुती दरम्यान दुर्दैवी मृत्यू..!!
बाळही दगावलं दोन लेकीचं मातृछत्र हरवले,
आरती पाटील (रत्नागिरी जिल्हा) प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातून एक दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. तेथील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा प्रसूती दरम्यान आपल्या बाळासह जीव गमावला आहे. या दुर्दैवी प्रसंगात आधीं असणाऱ्या दोन मुलींचे मातृछत्र हरपलं आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलचा प्रस्तुती दरम्यान रुग्णालयात आकस्मित मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारांस घडली आहे. सांची सुदेश सावंत (वय 36) असे मृत झालेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल चे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सांची सुदेश सावंत या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. गुरुवारी रात्री त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अचानकपणे आकडी आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. अधिक उपचारांसाठी शहरांतीलच दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारांस तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले, सांची सावंत यांचे पतीही पोलीस विभागातील श्र्वान पथकांतील पोलीस अमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला आधींच दोन मुली होत्या. सांची या तिसऱ्यांदा गरोदर असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला त्यांच्या मृत्यूने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
