पुणे येथे काळेश्वरी माता मंदिर केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांच्या हस्ते धर्मप्रसार आयाम अंतर्गत महापूजा संपन्न
पुणे प्रतिनिधी अनंत वांजळे
गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी, छत्रपती संभाजी महाराज भागातील वारजे प्रखंडात असलेल्या श्री काळेश्वरी माता मंदिर या ठिकाणी आदरणीय मिलिंद परांडे (केंद्रीय महामंत्री) यांच्या हस्ते धर्मप्रसार आयाम अंतर्गत महापूजा व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांयकाळी ८ वा मा. मिलिंदजी यांचे मंदिरामध्ये आगमन झाले. मातृशक्तीननी त्यांचे औक्षण करून स्वागत केले आणि मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले. यानंतर मंदिर समिती कडून मा.मिलिंदजी परांडे, प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण, अनिरुध्द जी पंडीत, संजयजी कुलकर्णी, नागनाथजी बोंगरगे, यांना शिवरायांचे चांदीचे टाक, पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर मिलिंदजी व प्रांतसमिती यांच्याहस्ते मच्छिंद्र महाराज वाळंज,कृष्णल सोनूगुरु तागुंदे,ताराताई व शोभाताई यांचा सन्मान करण्यात आला.
मिलिंदजी यांनी प्रबोधनात हिंदू मंदिरांचे महत्व, मंदिरे समाजप्रबोधनाची केंद्र कशी राहिली आहेत,तसेच हिंदू पूजापद्धती मध्ये झालेला बदल हाच हिंदूंच्या संस्कृतीवर घाव घालणारा आहे,इतर धर्मीय कोणत्या पद्धतीने आपल्या समाजाची दिशाभूल करतात,ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज आंतराष्ट्रीय षड्यंत्रापासून ते आपल्या वस्तीपर्यंत हिंदूंना धर्मांतरित करीत चाललाय याविरुद्ध उभे राहायचे असेल तर कोणी एकट्या दुकट्याचे कार्य नाही त्यासाठी अठरा पगड जातिजमातींचा हिंदू समाज पूर्ण शक्तीने उभा राहिला तर समाज परिवर्तनाची सर्वात मोठी क्रांती हा भारत घडवेल अश्या अनेक पद्धतीने मा. मिलिंदजी यांनी प्रबोधन केले. यानंतर देवीची मंत्रमुग्ध महाआरती संघटनेच्या सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आली.आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या मंदिरात गुरुवर्य मच्छिंद्र महाराज वाळंज व कृष्णल (सोनूगुरु)तागुंदे यांच्यामार्फत समाजप्रबोधन,व गोरगरीब हिंदू समाजाच्या अडचणी सोडवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसेच भाविकांसाठी मोफत अन्नछत्र हे काळेश्वरी मातेच्या नावाने चालविले जाते.देवीची उपासना करीत असताना हिंदू धर्माच्या रक्षणाचे कार्य अजून बळकट व्हावे तेथील भक्तांना कार्य करण्यास आणखी स्फूर्ती यावी यासाठी प्रत्येक कार्यक्रम दिशा दर्शक कार्यक्रम ठरेल अशी धारणा आहे.
सदर कार्यक्रमासाठी
मा.मिलिंदजी परांडे,(केंद्रीय संघटन महामंत्री)
श्री.किशोरजी चव्हाण,(प्रांत मंत्री प.महाराष्ट्र)
श्री अनिरुद्धजी पंडित,(प्रांत संघटन मंत्री)
श्री.संजयजी कुलकर्णी,(प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख)
श्री नागनाथजी बोंगरगे,(प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख.)
श्री अमरजी सातपुते, (धर्मप्रसार परियोजना प्रमुख प्रांत)
श्री समिरजी पायगुडे,(प्रांत धर्माचार्य संपर्क टोळी सदस्य).
तसेच जिल्हा समिती आणि वारजे प्रखंडातील धर्मप्रसार प्रमुख चेतनजी शेळके,वारजे प्रखंड मंत्री अनंतजी वांजळे तसेच सर्वसमिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यात अजून एक असं टाकायचं की वारजे माळवाडी भागामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून धर्म जागृतीसाठी असे उल्लेखनीय उपक्रम राबवले जावे अशी तिथे स्थानिक नागरिकांनी इच्छा दर्शवली
विश्व हिंदू परिषद बजरंग दल
वारजे माळवाडी प्रखंड
छत्रपती संभाजी महाराज भाग
