एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चोपडा ग्रामिण पोलीसाची दमदार कामगिरी, ०४ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) व ८ जिवंत काडतुस सह पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

चोपडा ग्रामिण पोलीसाची दमदार कामगिरी, ०४ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) व ८ जिवंत काडतुस सह पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

चोपडा जळगाव प्रतिनिधी

पारउमर्टी ता वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश) या गावाची सीमा महाराष्ट्र राज्याच्या चोपडा तालुक्यातील उमर्टी या गावाला लागुन आहे. पारउमर्टी येथे शिकलकर समाजाचे लोक राहत असुन ते पुर्वीपासुन अवैध अग्निशस्त्र व दारुगोळा बनवुन विक्री करीत असतात. त्यांच्या गैकृत्यास आळा बसावा याकरीता मागील एक महीन्यापासुन पोलीस अधिक्षक सो जळगाव डाँ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, कविता नेरकर मॅडम, पोलीस उपअधिक्षक चोपडा उपविभाग, आण्णासाहेब घोलप, यांच्या संकल्पनेतुन उमर्टी व सत्रासेन परिसरात २४बाय ०७ अशी नाकाबंदी लावण्यात आली आहे.

 

 

दिनांक २३/०७/२०२५ रोजी सत्रासेन नाका येथे नाकाबंदी ड्युटीस असलेले पोकाँ रावसाहेब एकनाथ पाटील, पोकाँ घनश्याम हिम्मत पाटील यांना उमर्टी नाक्याकडुन सत्रासेन बाजुकडे एक मोटर सायकल वेगात येतांना दिसली. त्यांनी त्वरीत बँरीकेट लावले असता मोटर सायकल चालकाने मोटर सायकल वळवुन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोकाँ रावसाहेब पाटील यांनी शिताफिने पकडले असता ते मोटर सायकलसह खाली पडले. त्यावेळी त्यांच्यापैकी मोटर सायकल चालविणा-या इसम नामे मंथन मोहन गायकवाड वय २२ वर्ष मुळरा. वडाळा ता. बार्शी जि. सोलापुर ह.मु. हडपसर मांजरी रोड टकले कॉलनी नं.१ गोपाळपट्टी मांजरी बु।। पुणे जि.पुणे याच्या बँगेत ०३ अग्निशस्त्र व ०६ जिवंत काडतुसे तसेच मागे बसलेल्या इसम नामे स्वप्निल विभीषण कोकाटे वय ३२ वर्ष मुळरा. रुई ता. वाशी जि. धाराशिव याच्या कब्जात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे मिळुन आली. सदर घटना पोकाँ रावसाहेब पाटील यांनी कळविल्यानंतर पो.नि अनिल भवारी, श्रेणी पोउपनि बापु सांळुंके, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ विशाल पाटील, व इतर यांनी पकडुन ठेवलेल्या वरील अग्निशस्त्र जवळ बाळगणा-या इसमांजवळ पोहोचुन पंचानाम्याद्वारे अग्निशस्त्र व काडतुसे जप्त केली.
अटक आरोपी यांच्या फोनवर व्हॉट्सअप कॉल येत होते त्यांना धुळे येथील लोकेशन पाठवुन तेथे येण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यादृश्टीने चौकशी करता अटक आरोपी यांनी त्याचे साथीदार आप्पासाहेब गायकवाड, कानीफनाथ बहीरट दोन्ही रा संभाजीनगर यांनी शस्त्र उमर्टी येथुन आणण्यासाठी मोटर सायकल देवुन मदत केली होती आणि ते स्वत धुळे येथे चारचाकी गाडी घेवुन थांबले होते, अटक आरोपी हे शस्त्र घेवुन फरार आरोपी यांना चारचाकी गाडीतुन सुरक्षीत वाहतुक करण्यासाठी ताब्यत देणार होते अशी माहीती दिली त्याचप्रमाणे अटक आरोपी यांनी उमर्टी येथील शिकलकर टोपन नाव (पाजी) याने सदरची अग्निशस्त्र व काडतुसे ५०,०००/-रुपयात विक्री केल्याचे सांगीतले. अटक आरोपीपैकी मंथन गायकवाड याच्यावर अग्निशस्त्र विक्रीते गुन्हे दाखल असुन सदरचे अग्निशस्त्र आरोपी कोणास विक्री करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link