एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी पुणे

 

आजच्या महाराष्ट्रात जेव्हा खऱ्या नेतृत्वाबद्दल चर्चा होते, तेव्हा पहिलं नाव घ्यावं लागतं ते अजितदादांचं. कारण, दादा म्हणजे निर्णयक्षमतेचं आणि निष्कलंक कार्यक्षमतेचं प्रतीक. प्रशासनावर अत्यंत अचूक पकड असलेले, कोणताही विषय खोलवर समजून घेणारे, आणि निर्णय घेताना लोकहिताला अग्रक्रम देणारे आणि रोखठोक बोलणारे गरिबांचा खरे कैवारी दादा हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेता आहेत त्यांचं नेतृत्व हे केवळ राजकीय नसून, सामान्य माणसाला स्फूर्ती देणारं आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी झटणारे, प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने पाहणारे, आणि माणुसकीचा गहिरा स्पर्शअसलेले दादा आज कोट्यवधी जनतेचा आधार, विश्वासू बनले आहेत खेड तालुक्यातसुद्धा अशाच एका नेतृत्वाची प्रतिमा दिसते, ती म्हणजे आमचे मार्गदर्शक, माजी आमदार मा. दिलीप अण्णा मोहिते पाटील. अजितदादांना आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या अण्णांच्या नेतृत्व शैलीतही तोच तीच लोकांसाठीची धडपड, आणि जनतेशी असलेली नाळ जाणवते. त्यामुळेच आम्ही त्यांना “कार्यसम्राट” ही उपाधी देतो. पद असो वा नसो, अण्णा नेहमीच लोकांसाठी झटत राहतात हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी ओळख आहे.सप्तरंग कलेक्शन आणि सप्तरंग मिसळ हाऊस या आमच्या व्यावसायिक उपक्रमाच्या उद्घाटनाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित राहिले ही आमच्यासाठी अभिमानास्पद आणि संस्मरणीय बाब ठरली. एक तरुण उद्योजक म्हणून मला आणि माझ्या पत्नीला, अश्विनी पाचारणे यांना, दादांकडून मिळालेली ही प्रोत्साहनाची ऊर्जा आजही प्रेरणा देते दादांची शिस्त जितकी ठाम, तितकीच त्यांची माणुसकीही अपार. उद्घाटनाच्या दिवशी दादांनी हसत-हसत म्हटलं, “अरे बाबा, सप्तरंग मिसळ हाऊसचे उद्घाटन झालं पण मला काही मिसळ खायला मिळाली नाही बुवा!” या मिश्किल वाक्याने सगळं वातावरण हलकं-फुलकं होऊन सर्वीकडे हास्यकल्लोळ झालं. हीच दादांची खासियत प्रेमळ, हसतमुख आणि सर्वांशी सहज संवाद साधणारे नेतृत्व.
त्या कार्यक्रमात अश्विनी पाचारणे यांनी दादांकडे एक विनंती केली मा. दिलीप अण्णांना विधान परिषद आमदार करावे हेच दादांचं वैशिष्ट्य ते फक्त राजकारणी नाहीत, तर समाजकारणाच्या प्रत्येक पैलूसोबत जोडलेले देवमाणूस आहेत.दादांचा स्पष्टवक्तेपणा, अचूक काम करण्याची कार्यशैली आणि निर्णयक्षम वृत्ती यामुळे त्यांचं नेतृत्व हे आजच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. म्हणूनच आम्हा लाखो कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे .
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो. आपली लोकसेवेची भावना अधिकाधिक दृढ होत जावो. आपलं नेतृत्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहो. आपण अशीच निस्वार्थपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहावं… हीच सदिच्छा.दादांना मनापासून अभिवादन आणि वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!शुभेच्छुक : .अश्विनी राजेंद्र पाचारणे उपाध्यक्ष – राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड आणि .राजेंद्र शांताराम पाचारणे सर्वेसर्वा – आरीकेत ग्रुप ऑफ कंपनीज – चाकण – खेड.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link