अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अवैद्य गुटखा वाहतुकीवर नेकनूर पोलिसांची धमाकेदार कामगिरी…!!
गाडीसह एकूण 20,71,640 रूपयांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!
कलावती गवळी (बीड जिल्हा ) प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर पोलिसांची चांगलीच करडी नजर असूनही गुटखा विक्री मात्र जोमात सुरू आहे. सध्या शहरांत आणि ग्रामीण भागात गल्लीबोळात ही टपऱ्यावर गुटखा आरामात मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेकनूर पोलीस ठाण्याच्या धुळे सोलापूर हायवेवर वानगांव शिवारांत नेकनूर पोलिसांनी धमाकेदार कारवाई करत लाखोंचा गुटखा वाहनासह हस्तगत केला आहे. रजनीगंधा बाबा आणि विमल कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती समोर आहे. याबाबत नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत गोसावी यांना गोपनीय माहिंतीच्या आधारे आयशर टेम्पोतून गुटखा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आपल्या पोलिस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांना सूचना करीत मध्यरात्री एकच्या सुमारांस सापळा लावून नेकनूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 20 लाख71 हजार 640 रूपयांचा मुद्देमाल ही हस्तगत केला आहे. पुढील तपास सुरू आहे, या कारवाईमुळे सध्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरांत सध्या अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. नेकनूर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.
