अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पोलीस अधिक्षकांनी राबविले मिशन ऑल आऊट स्किम, या मोहिमेअंतर्गत कासोदा पोलिसांनी केला अवैद्य दंध्याचा गेम..
प्रतिनिधी कासोदा समाधान पाटील
कासोदा येथील पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे वाल्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून, कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि. निलेश राजपूत साहेब व सहकाऱ्यांनी, विनापरवाना देशी- विदेशी दारू, गा.हा.भट्टी ची दारुविक्रेत्यांसह, विनापरवाना अवैधरित्या सुरू असलेला, जुगार, मटका-सट्टा, गौण खनिज, वाळू आदि अवैध धंदे वाल्यांवर कारवाईसुरु केल्याने अवैध धंदे वाल्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुज्ञ नागरिकांतर्फे पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त
कासोदा पो.स्टे. हद्दीतील ताडे रस्त्यालगत असलेल्या चाऱ्याच्या कुटीच्या पत्री शेडच्या आडोशाला देशी-विदेशी दारूची गैर कायदा चोरटी विक्री होत. असल्याची गुप्त माहिती मिळताच, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी राबविलेल्या ऑल आऊटस्कीम मोहिमे अंतर्गत, तथा सहा. पोलीस अधीक्षक, भाग चाळीसगाव व उपविभागीय पो. अधिकारी. यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जाऊन, सपोनि निलेश राजपूत साहेब व कर्मचाऱ्यांनी दिनांक २१जुलै रोजी रात्री ८:०० वाजता धाड टाकून या ठिकाणी विक्री होत, असलेली अवैधरित्या देशी विदेशी दारू जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.
तर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये अंदाजे ३८,१७५/-. इतक्या रुपयाची अवैध देशी-विदेशी दारू (Domestic and foreign liquor) जप्त करण्यात आली असून.
कासोदा पोलीस व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ट पोलीस अधिकारी यांनी दिलेल्यासुचने व आदेशानुसार मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे -ब्राम्हणे येथे धाड टाकली असतांना, या धाडीत किरण भारत पाटील वय ३९ राहणार ब्राम्हणे. सदर व्यक्ती हा अवैधरित्या विना परवाना गैरकायदा देशी -विदेशी दारू विक्री करतांना व स्वतःच्या कबज्यात बाळगत असल्याचे आढळले. त्याच्याकडून विविध कंपन्याचे देशी-विदेशी असा एकूण ३८,१७५/-रु हजार रुपये किमतीचा माल पंचांसमक्ष जप्त करून कासोदा पोलिसात, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई ) नुसार गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत न कळत काही अवैध धंदे सुरु असल्याचे समजतात, तात्काळ गोपनीय माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, वरिष्टांच्या आदेश व मार्गदर्शन सुचनेनुसार धाडी टाकण्यात येत असून, पो.स्टे.हद्दीत एकही अवैध धंदा सुरू राहणार नाही, असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन शी संपर्क साधुन, माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
निलेश राजपूत
सहा.पोलीस निरीक्षक, कासोदा पो.स्टे.
