नागपूर शहर अतर्गत बजाजनगर पोलीस ठाणे हददीतील हॉटेल बकासुर रेस्टॉरेन्ट व अपना धाबा एन.एच 01 रेस्टॉरेंन्ट हे 15 दिवस करीता बंद केले.
प्रतिनिधी: सतीश कडू नागपूर
नागपूर :पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अतर्गत पोलीस परिमंडळ क्र. 01 अंतर्गत बजाजनगर पोलीस ठाणे हददीत पोलीस उप आयुक्त परी. क 01 यांच्या आदेशाने दि. 22जुलै 2025 रोजी रात्री 10.30 वा. दरम्यान 1) हॉटेल बकासुर रेस्टॉरेन्ट व 2) हॉटेल अपना धाबा एन.एच.01 रेस्टॉरेन्टवर कारवाई करण्यात आली असुन सदर हॉटेल वर या अगोदर पण खालील प्रमाणे कार्यवाही आहे.
1) हॉटेल बकासुर रेस्टॉरन्ट
गु.रजि.गुन्हा169/2024कलम 68 मदाका17/06/2024 सध्या स्तिथी196/2024कलम 68 मदाका सहकलम 33 आरडब्लू
19/07/2024न्यायप्रविष्ठ
2)न्यायप्रविष्ठ133 मयोका
3)323/2024कलम 68 मदाका08/12/2024
न्यायप्रविष्ठ4)14/2025
कलम 68 मदाका
24/01/2025न्यायप्रविष्ठ
5) 183/2025कलम 68 मदाका23/07/2025
तपासावर
2) हॉटेल अपना धाबा एन.एच.01
१)१४७/२०२४ कलम ६८ मदाका१४/०६/२०२४
२)२६९/२०२४ कलम ६८ मदाका२०/१०/२०२४
न्यायप्रविष्ठ
१८८/२०२४ कलम ६८ मदाका
०९/०७/२०२४
न्यायप्रविष्ठ
४)१६६/२०२५ कलम ६८ मदाका०६/०७/२०२५
न्यायप्रविष्ठ5)१८२/२०२५ कलम ६८मदाका२३/०७/२०२५
तपासावर
वरील प्रमाणे दोन्ही रेस्टॉरेन्टवर कारवाई करण्यात आली असुन सुध्दा वारंवार हॉटेलमध्ये ग्राहकांना दारू पिण्याकरीता जागा, साहीत्य उपलब्ध करून देत असल्याने त्यांच्या वर आस्थापनेत कुठलीही सुधारणा झालेली नाही. तसेच अनेक सामाजीक संघटनेने बजाजनगर चौक येथील अशा अस्थापनेविरूध्द पोलीस ठाणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आस्थापना चालकांचे वरील गैरकायदेशीर कृत्यावर योग्य आळा बसणे आवश्यक असल्याने त्यांच्या या गुन्हयामळे निकट भविष्यात असलेले
सन/उत्सव महापुरूशांची जयंती येत असुन सदरहु अस्थापना चालक 1) भरत सुशील दुबे 2) रोहीत राजु मेश्राम (बकासुर रेस्टॉरेन्ट) 3) मंगेश विजय काशीकर (हॉटेल अपना धाबा एन.एच.01) यांनी त्यांचे कृत्य या काळात सुरू ठेवल्यास याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच नजिकच्या काळात इतर सन असल्याने या दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता कलम 142 (2) महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम अंतर्गत हॉटेल दि. 23/07/2025 पासुन 15 दिवसांकरीता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सिंगा रेड्डी ऋशिकेष रेड्डी पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र.01 नागपूर शहर यांनी केली आहे.
