शाळामहाविद्यालयात नोकरीस असून क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांविरुद्ध निवेदन
प्रतिनिधी रवींद्र पाटील
नाशिक : येथील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीएच्या वतीने आज, शाळा महाविद्यालयात नोकरीस असून बाहेर किंवा त्याच शाळामहाविद्यालयाच्या इमारतीच्या वर्गांमध्ये, विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारुन, अनधिकृतपणे खाजगी शिकवणीवर्ग घेणाऱ्या शिक्षकांच्या नावांसह निवेदन देण्यात आले. यावर सात दिवसांत कारवाई न झाल्यास, शिक्षण उपसंचालक नाशिकरोड यांच्या कार्यालयासमोर, धरणे आंदोलन करुन, उपोषण करण्यात येईल तसेच अशा भ्रष्टाचारी शिक्षकांच्या क्लासेसमध्ये घूसून, त्यांचे स्टिंग ऑपरेशन करुन व्हिडिओसाठी पुरावे गोळा करण्यात येतील व या क्लासेस समोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. यामध्ये काही संस्थाचालकही सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे . शिक्षणहक्क कायदा २००५ नुसार हे बेकायदेशीर कृत्य आहे. अशाप्रकारे क्लासेस घेताना हे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलचे व तोंडी परिक्षांचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवतात असा आरोप संघटनेने केला आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष विवेक भोर, मुकुंद रनाळकर, अरुण कुशारे, चेतन माडीवाले, रविंद्र पाटील, निलेश दूसे, वाल्मिक सानप, पवन जोशी, प्रमोद गुप्ता, दिपक गुप्ता, प्रतिभा देवरे, विद्या राकडे, दिनेश राठोड, लोकेश पारख, विक्रमराजे गोसावी, मयुर जाधव, विश्वकर्मा, हरिभाऊ वाकचौरे, अशोक देशपांडे, अर्जुन शिंदे, स्वाती जगताप, इम्रान पटेल, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
