अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबई प्रतिनिधी प्रमुख किशोर गुडेकर
दोन महिन्यांतच सीवूड्स विभागातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची वंचितचे ॲड.उमेश हातेकर यांची आयुक्तांकडे मागणी.
सीवूड्स विभागातील रस्त्यांची कामे हि मागील २ महिन्यांपुर्वी करण्यात आली. परंतु २ महिन्यांतच सीवूड्स विभागातील रस्त्यांची दुर्दशा झाली. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या आर्थिक युतीमुळे नवीमुंबई मधील रस्त्यांची वाट लागली आहे. कोणतेही अधिकारी हे कंत्राटदारावर कारवाई करताना दिसत नाहीत. रस्त्यावरील डांबर निघुन सर्वत्र रस्त्यावर खडींचे साम्राज्य झाले आहे. येत्या १० दिवसात रस्त्यावरील सर्व खडीं हटवण्यात यावी व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे ॲड. उमेश हातेकर यांनी पत्राद्वारे नवीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांना दिला.
