एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बाराशिव जवळ भरधाव क्रूझरच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू. पाच जण गंभीर जखमी

बाराशिव जवळ भरधाव क्रूझरच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू. पाच जण गंभीर जखमी.

प्रतिनिधी: त्र्यंबक भालेराव


जवळा बाजार:(बाराशिव)औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव क्रूझर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक शिक्षक ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. २३ दुपारी घडली आहे. जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रस कहऱ्हाळे येथील काही वारकरी आज दुपारच्या सुमारास क्रूझर जीपने पंढरपूरकडे निघाले होते. त्यांची जीप औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर आली असतांना समोर धावणाऱ्या दुचाकीला जीपने धडक दिली. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन जीप थेट रस्त्याच्या खाली असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळळी.या अपघातात दुचाकीवरील विठ्ठल सावंत (३७, रा. बोरीसावंत) यांचा मृत्यू झाला. तर जीप झाडावर आदळल्यामुळे जीप चालक भागवत घोंगडे यांच्यासह जीपमधील सुभाष शेळके, प्रमोद कहऱ्हाळे, ज्ञानबा कहऱ्हाळे, बंडू शेळके हे गंभीर जखमी जाले. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार प्रफुल्ल आडे, हिरामण चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जीपमधे अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून उपचारासाठी परभणी येथे रवाना केले आहे.

दरम्यान, या अपघातातील मयत विठ्ठल सावंत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. मयत विठ्ठल हे बाराशिव येथील एका इंग्रजी शाळेवर शिक्षक म्हणून काम करतात. शाळा सुटल्यानंतर ते दुचाकी वाहनाने बाराशिव येथून बोरीसावंत येथे गावाकडे निघाले होते. यावेळी हा अपघात झाला. या घटनेमुळे बोरीसावंत गावावर शोककळा पसरली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link