पुणे शहरांत कायम बदल्यांचा दणका : 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या :-
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश..!!
कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस दलात कायम पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचा दणका पाहायला मिळतोय मंगळवारी रात्री उशिरा 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले आहेत. पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेशामध्ये चार गुन्हे पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग येथून पुणे शहर पोलीस दलात बदली झालेल्या पोलीस निरीक्षक अलका सगर यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे, (बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची पुढील प्रमाणे नावे) संतोष पांढरे विठ्ठल पवार यशवंत निकम उत्तम भुजनावळे विक्रमसिंह कदम दिलीप फुलपगारे विजय मला पवार राहुल गौड युवराज नांद्रे उल्हास कदम जितेंद्र कदम दत्तात्रय बागवे अशा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही पोलीस निरीक्षकांच्या महिन्याभरांतच बदली करण्यात आली आहे. या बदल्या आदेशामध्ये पोलीस आयुक्तांनी नव्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
