पी एम सी नवोदय विद्यालयाची उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून पाहणी सोई सुविधाचा अभाव जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर.
हिंगोली प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील.
वसमत: हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पीएमसी नवोदय विद्यालय या ठिकाणच्या सोयी सुविधेच्या संदर्भात रविवारपासून सुरू असलेल्या बातम्या यासंदर्भात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेलने प्रसिद्ध केलेल्या बातमीतून पीएमसी नवोदय विद्यालय येथील 450 विद्यार्थ्यांच्या गैर सोई सुविधा संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून नवोदय विद्यालयाच्या प्रिन्सिपल यांना टी .सी .मागण्याची विनंती केल्याची बातमी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चैनलने दाखवल्यानंतर सदरील बातमीची दखल घेत हिंगोली जिल्हा प्रशासन यांनी आदेश देऊन उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार शारदाताई दळवी यांनी मंगळवार रोजी उशिरा पीएमसी नवोदय विद्यालय परभणी रोड येथील जाऊन पाहणी केली असता सदरील पाहणी दरम्यान नवोदय विद्यालय येथील सोई सुविधा अभाव दिसून आला त्या ठिकाणची अस्वच्छता निकृष्ट दर्जाचे अन्न अस्वच्छ पाणी सांडपाण्याचा प्रश्न व परिसरातील वाढलेले गवत त्यामुळे वन्य प्राण्याचा त्या ठिकाणी सहवास व किचन रूम मधील गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली रोटी मेकर विद्यार्थी निवासी ठिकाणांमधील अस्वच्छता व त्या ठिकाणी वरील विद्यार्थ्यांचे निवासी वस्ती मधील पसरलेले कपडे दुर्गंधीजन्य श्वास व दररोज दिल्या जाणाऱ्या आहारामधील निकृष्ट दर्जाचे आहारातील जेवण व त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची सदरील प्रशासना संदर्भात मोठी नाराजी दिसून आली उपविभागीय अधिकारी विकास माने सर व तहसीलदार शारदाताई दळवी यांनी पीएमसी स्कूल मधील विद्यार्थ्यासोबत जेवण घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शालेय विद्यार्थ्यामार्फत केलेल्या चर्चेतून माहिती घेतल्यानंतर तेथील अनेक त्रुटी निदर्शनास आल्या सदरील घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वरिष्ठ कार्यालयास कळवले आहे असल्याची माहिती मिळाली आहे
