पालकाचा खून करून फरार संस्था चालक पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी :श्रीहरी अंभोरे पाटील
झिरो फाटा :परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका अंतर्गत एरंडेश्वर येथील जगन्नाथ शेंडगे हे झिरो फाटा येथील हायटेक शाळेतील आपली मुलगी तिची टीसी काढण्याकरता 10 जुलै रोजी झिरो फाटा येथील शाळेत गेले होते तेथील उपस्थित स्टॉपला माझी मुलगी शाळेत राहत नाही त्यामुळे तिची टीसी काढायची आहे अशी माहिती दिल्यानंतर उपस्थित शाळेतील स्टॉप ने माहिती न देता संस्था चालक प्रभाकर चव्हाण व पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्यासोबत जगन्नाथ हेडगे यांचा सुरुवातीला शाब्दिक वाद होऊन नंतर जगन्नाथ हेडगे यांना संस्थाचालक पती-पत्नी या दोघांनी मिळून ऑफिसमध्येच बेदम मारहाण केली या मारहाणीतून त्याला ऑफिस बाहेर काढल्यानंतर समोरील गेट जवळ तो बाहेर जात नाही म्हणून परत त्या ठिकाणी मारहाण केली त्यानुसार जगन्नाथ शेंडगे यांच्या सोबत असलेल्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये 10 जुलै रोजी दाखल केले होते त्यानुसार उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जगन्नाथ शेंडगे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यावरून पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये सदरील घटनेच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती तेव्हापासून संस्थाचालक पती व पत्नी परभणी पोलिसांना चकवा देत फरार होते पण तब्बल बारा दिवसांनी विद्यार्थ्याच्या पालकाचाखून खुन प्रकरणातील संस्थाचालक आरोपी प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण फरार असलेल्या आरोपीला परभणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले व पूर्णा जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर उभे केले सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील हे तपास पाहत होते त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समाधान पाटील सोबतच राजू मोतेवार मधुकर चट्टे रवींद्र बेंद्रे व इतर पोलीस कर्मचारी यांनी सदरील घटनेतील आरोपींना पकडण्यात मोठे यश आले आहे
