लोकस्वराज्य आंदोलनांच्या कार्यकर्त्यांचा समाज बांधवाकडुंन यथोचित सत्कार समारंभ संपन्न…
कलावती गवळी ( नांदेड जिल्हा ) प्रतिनिधी
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागील दिं.१० जुलै रोजी मुंबई येथील पावसाळी अधिवेशनावर लोकस्वराज्य आंदोलनाचे संघर्ष नायक तथा मार्गदर्शक प्रा.रामचंद्रजी भरांडे सर,व्ही.जी.डोईवाड, रावसाहेबदादा पवार,गणपतराव रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एससी आरक्षण उपवर्गीकरण विधेयक तात्काळ मंत्रिमंडळात मंजूर करावे. तसेच सेवानिवृत्त न्यायमुर्ती अनंत बद्दर समितीचाअहवाल काल मर्यादेत परिपुर्ण करुन राज्य सरकारला सादर करावे. सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाला १००० कोटी रुपयांचे एक रक्कमी भाग भांडवल निधी मंजुर करावे.स्वाधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावे. अशा अन्य मागण्या घेऊन आझाद मैदान येथे महाएल्गार आंदोलन आणि विधानसभा सभागृह समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनात हिमायतनगर तालुक्यातील लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते यांनी समाजाच्या प्रश्नावर सातत्य पुर्ण लोकशाही मार्गाने आंदोलन करीत समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागु करण्यात यावे.ही मागणी घेऊन राज्य सरकारला धारेवर धरुन त्यांनी हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली होती.त्यामुळे समस्त समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष मा.श्री धोंडोपंत बनसोडे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष सदानंद ऐरणकर,तालुका सचिव रामदास जळपते पोटेकर व अन्य कार्यकर्त्यांनी सामाजिक योगदान देऊन समाजाचे विविध प्रश्न व विविध मागण्या सरकार समोर ठेवून ईमानदारी पूर्वक काम केल्याबद्दल समस्त समाज बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दशरथ आंबेकर,इरेगाव विलास भालेराव,लक्ष्मण गाडगेराव,देवानंद गुंडेकर,राम चिंतलवाड, गंगाधर गायकवाड,बालाजी गुंडेकर आदींनी शहरात सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना शाल,श्रीफळ, हार,पुष्पगुच्छ देऊन येत्तोचित सत्कार करण्यात आला आहे.तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
