भारतीय जनता पार्टीच्या बीड तालुका सरचिटणीस पदी अप्पासाहेब झोडगे यांची निवड
(बीड प्रतिनिधी ) विवेक कूचेकर
बालाघाटावरील चौसाळा परिसरातील कानडी घाटचे उपसरपंच अप्पासाहेब झोडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या बीड तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असुन ही निवड आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे, मा. खा. प्रितमताई मुंडे, जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे,जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले,जिल्हाउपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा कोषध्यक्ष चंद्रकांत फड,यांच्या सुचनेनुसार बीड तालुका अध्यक्ष अशोक दादा रसाळ यांनी ही निवड केली
आहे.अप्पासाहेब झोडगे हे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन त्यांनी चौसाळा परिसरासह बालाघाटावर अनेक कार्यकर्ते जोडले असुन वाडी, वस्ती, तांडयावर जावुन लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाचा प्रचार प्रसार मोठया प्रमाणावर केला होता तसेच ते कानडीघाट या गावचे उपसरपंच असुन अनेकाच्या सुख दुखात धावुन जाणारा कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख असुन या कामाची पावती म्हणुन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या बीड तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे बालाघाटासह चौसाळा परिसरातुन त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
