आज दि.२२/७/२०२५ रोजी स.९:०० वाजता,
चैतन्य भाषा प्रसार मंडळाचे कार्यकारी मंडळ आनंदक्षण,सिंहगड रोड ,पुणे मध्ये पोहोचले.
आनंदक्षण ही संस्था मुलांना हसत खेळत ज्ञान संवर्धन करण्याचे काम अनेक वर्षे करत आहे.या संस्थेच्या संचालिका व त्यांच्या टीममधील सर्व सहाय्यक वर्गाने तिथे ज्ञानदानाचे काम कसे चालते हे सांगितले ,दाखवले.एकूण १९० मुलांनी कथाकथन स्पर्धेत,संतांच्या गोष्टी या विषयावर कथा कथन करणे,तसेच संतांचे चरित्र स्वतःचे अक्षरात लिहून आणणे म्हणजेच मराठी हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता.त्या मुलांना चैतन्य भाषा प्रसार मंडळातर्फे आज प्रशस्तिपत्रके देण्यात आली, खाऊ देण्यात आला, तसेच आनंदक्षणच्या संचालिका सौ.अमरजा जोशी यांनी हा जो स्तुत्य उपक्रम राबवला आहे त्यासाठी त्यांना एक सन्मानचिन्ह व गौरवपत्र चैतन्य भाषा प्रसार मंडळच्या संस्थापिका सौ.अनिता जोशी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.त्यावेळी सौ.रेवती रायरीकर,सौ.अवंती बायस,सौ.मुग्धा पत्की,कुमुदिनी बिल्ला तसेच श्री.मुकुंद उत्पात जातीने हजर होते. मा.देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री) व मा.अजितदादा पवार( उपमुख्यमंत्री)यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला.
