अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांनी सेल्फ सर्वे करून घ्यावा-आमदार श्री बाबाजी काळे
ग्रामीण भागातील घरकुलाच्या सेल्फ सर्वे ला 31 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ
खेड प्रतिनिधी
*प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नव्याने घरकुलाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन सेल्फ सर्वे करण्यासाठी 31 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. बेघर असलेल्या, घरकुला पासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांनी, नागरिकांनी मोबाईल ॲपद्वारे किंवा आपल्या ग्रामसेवका मार्फत सेल्फ सर्वे करून घ्यावा असे आवाहन खेड आळंदी विधानसभेचे आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांनी केले आहे.*
प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सध्या सेल्फ सर्वे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेखर असलेल्यांनी ,ज्यांना घर नाही अशा नागरिकांनी यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांच्यामार्फत किंवा आपण स्वतः सेल्फ सर्व करून आपली नोंदणी करू शकता निकषांचे पालन करून कच्चे घर असणाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सेल्फ सर्वे करून आपली नोंदणी करून घ्यावी ही नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ 31 जुलै 2025 पर्यंत मिळालेली आहे. खेड आळंदी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेल्फ सर्वे करून घ्यावा हा सर्वे करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी मदत करावी, व ग्रामसेवकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन खेड आळंदी विधानसभेचे आमदार श्री बाबाजी काळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
*असा करा सेल्फ सर्वे*
प्रधानमंत्री आवास योजनेचा सेल्फ सर्वे करण्यासाठी आवाज प्लस 2024 हे शासनाचे अधिकृत प्ले स्टोअर ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे, आधार फेस आयडी हेदेखील ॲप इन्स्टॉल करून घ्यावे त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन करून ॲपवर विचारलेली माहिती भरावी शेवटी आपल्या कच्च्या घराचा फोटो व आपण बांधणार असलेल्या घराची जागा पी टी आर माहितीपत्रक किंवा त्या ठिकाणचा फोटो अपलोड करावा आधार व जॉब कार्ड चे व्हेरिफिकेशन करून केलेला सर्वे अपलोड करावा
जर स्मार्टफोन उपलब्ध नसेल किंवा तांत्रिक बाबी हाताळण्यास अडचणीत असेल तर आपल्या गावचे ग्रामसेवक यांच्यामार्फतही सर्वे करून घेण्यासाठी अर्ज करता येतो.
