करा दिव्यांगत्वावर मात उभे राहू दिमाखात
लक्ष्य आणि मधु तारा यांचे दिव्यांगांसाठीचे कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर दिमाखात संपन्न.
रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी दिव्यांग पणावर मात करण्यासाठी लक्ष्य फाऊंडेशन महाराष्ट्र आणि मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर हे पुण्यातील देहू रस्ता मोशी भागातील जनसेवक निलेश बोराटे जनसंपर्क कार्यालय येथे असंख्य राज्यभरातील लाभार्थी दिव्यांग यांच्या उपस्थितीने पार पडले.
लक्ष्य फाऊंडेशनचे प्रमुख आरोग्यदुत. दिव्यांगदूत सन्माननीय श्री रोशनजी मराठे यांनी राज्यभर आरोग्य दिव्यांगानांसाठी कार्य करणाऱ्या मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशनला सोबत घेऊन दिव्यांगांसाठी कार्य करण्याची संधी दिली.
नवसंजीवनी दिव्यांगांसाठी हा उपक्रम जनसेवक मोशी परिसरातील सर्वांचे लाडके नेते श्री नीलेशजी बोराटे यांनी आयोजक म्हणून सर्व दिव्यांगांसाठी दिव्यांगदूत ठरले.
रत्ना चेरिटेबल ट्रस्ट.एटॅलास यांचे सहकार्य लाभल्या मुळे राज्यभरातील असंख्य दिव्यांगाना या उपक्रमाचा लाभ घेता आला.श्री नीलेशजी बोराटे यांनी अत्यंत प्रभावी नियोजन करत लक्ष्य फाऊंडेशन आणि मधु तारा फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत पदाधिकारी यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले.अथक परिश्रम आणि प्रत्येक वेळेस उत्तम नियोजनात शिबिर राबविणारे यशस्वी उपक्रम लक्ष्य फाउंडेशनच्या टीमने पार पाडत अनेक वेळा मधु ताराला सोबत घेऊन उपक्रम करीत आहे म्हणून मधु तारा प्रमुखांनी श्री रोशनजी मराठे यांचे आभार व्यक्त केले व श्री नीलेशजी बोराटे यांचे दिव्यांगांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन केले.
या प्रसंगी दिव्यांगाना रोजगार आणि स्वयंरोजगार देणाऱ्या कृषी गौरव फाऊंडेशनचे प्रमुख श्री प्रतापजी सिंह हे मधु ताराच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल श्री नीलेशजी बोराटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
असंख्य लाभार्थी दिव्यांगांच्या उपस्थित श्री रोशनजी मराठे आणि त्यांच्या टीमने उपस्थित दिव्यांगांना मार्गदर्शन केले.
या वेळी मधु ताराचे 86 टक्के दिव्यांग असलेल्या निर्मलाताई चौधरी.प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री बारावकर काका यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे.मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी.मधु तारा पिंपरी चिंचवड उपप्रमुख डॉ आरती राऊत यांना या वेळेस स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
येत्या काही दिवसातच कृत्रिम अवयवांसाठी मोजमाप झालेल्या असंख्य दिव्यांगाना भव्य कार्यक्रमात कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार असल्याचे लक्ष्य फाऊंडेशनचे प्रमुख श्री रोशनजी मराठे यांनी सांगितले.
या वेळेस राज्यभरातून आलेल्या लक्ष्य आणि मधु ताराच्या संपर्कातीलउपक्रमास आलेल्या असंख्य दिव्यांगांनी भरभरून आशीर्वाद दिले.
