किसान ब्रिगेडच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी कृषीभूषण भगवानभाई इंगोले
हिंगोली . श्री श्रीहारी अंभोरे पाटील
नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील शेती निगडित असलेले नेहमी शेतकरी समाजसेवेसाठी आणि शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देणार्या किसान ब्रिगेडच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी कृषीभूषण भगवानभाई इंगोले यांची निवड हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील लुट वापसी एल्गार परिषदेत किसान ब्रिगेडचे संस्थापकीय राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे यांनी एका कार्यक्रमात केली आहे.
नेहमीच सेंद्रिय जैविक शेतीशी चळवळ नांदेड जिल्ह्यातील शेतकरी यांच्या साठी कार्यरत असणारे कृषीभूषण भगवानभाई इंगोले यांना महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार २०१९ ला मिळाला होता, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मास्टर ट्रेनर म्हणून भारत सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच विकेल ते पिकेल या विभागीय समितीवर त्यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून सेंद्रिय नैसर्गिक शाश्वत योगीक शेतीच्या माध्यमातून भगवानभाई इंगोले हे राज्य व देश पातळीवर शेतकर्यांना प्रशिक्षण देतात. शेतकरी मित्र कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांचा खर्च कमी होवून शेतकर्यांच्या मालाला योग्य दर व किमंत मिळावी या हेतूने शेतकर्यांच्या मालावर प्रक्रिया करून ते देश व देशाबाहेर निर्यात करतात. दरम्यान भगवानभाई इंगोले यांना ग्रामिण भागात मानणारा शेतकरी मोठा वर्ग आहे. शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून किसान ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे यांचे हात बळकट करण्यासाठी व अन्नदाता शेतकर्यांच्या मालाला योग्य दाम मिळावा, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्त मिळावी, यासाठी प्रकाश पोहरे यांच्या खांद्याला खांदा लावून या पुढे शेतकर्यांसाठी काम करणार असल्याची ग्वाही किसान ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष कृषीभूषण भगवानभाई इंगोले यांनी दिली आहे. त्यांच्या निवडीचे नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी स्वागत केले आहे
