अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
कष्टकरी तरुण मंडळाच्या वतीने महालक्ष्मी देवीचा भव्य मिरवणूक, व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
हरकानगर काशेवाडी येथील कष्टकरी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महालक्ष्मी मंदिरा मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले, यामध्ये भजन, कीर्तन, देवीचा महापूजा व तसेच महालक्ष्मी देवीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी विक्रम पवळे, आदित्य पवळे, पृथ्वीराज ऊल्लारे, गोविंद ससाणे, गौरव चांदणे, यश उकरंडे, सुरज शेंडगे, सुमित भोसले, प्रज्वल साळवे, प्रज्वल सपकाळ, आदित्य ओवाळे, आदि यावेळी उपस्थित होते,
