एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

दोन दुचाकी गाड्या जप्त करून दोन चोरटयांना ठोकल्या बेडया.

पुणे समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

पुणे :आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी समर्थ पोलीस ठाणे अंतर्गत दोन दुचाकीसह दोघांना अटक करण्यात आली
सविस्तर असे की समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर-१६६/२०२५ भा.न्या. संहिता कलम-३०३ (२) प्रमाणे दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी गाडी क्र. एमएच/१२/पीआर/६३६१ ही के. के. मोटर्स नावाचे पावर हाऊस चौक रास्ता पेठ पुणे येथे पार्क केली असता अज्ञात इसमाने लबाडीच्या इरादयाने चोरी केल्या बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे. तसेच गुन्हा रजि नबर-१६८/२०२५ भा.न्या. संहिता कलम ३०३ (२) गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी इलेक्ट्रीक, बजाज कंपनीची चेतक गाडी क्र. एम एच १२ डब्ल्यू जी ८८२२ इनामदार चौका जवळ लॉक करून पार्क केली असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांची वरील वर्णनाची दुचाकी लबाडीच्या इरादयाने चोरी केले बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे.

मा. वरीष्ठांच्या आदेशाने वरील प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटरसायकल चोरी करणा-या अज्ञात चोरट्या इसमाचा शोध घेण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथक रवाना केले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे यांनी घटनास्थळ तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन त्याचे विष्लेशन करुन तसेच गोपनिय बातमीदार यांच्या कडुन माहीती प्राप्त करुन मोटरसायकल चोरी करणा-या अज्ञात चोरट्या इसमाचा मागोवा घेत आरोपी पर्यंत पोहचुन सुतारवाडी, पुणे येथे मोटरसायकल चोरी करणा-या इसमास शिताफीने पकडुन त्याच्या कडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता आरोपीने त्याचे नाव सागर वसंत शिंदे वय – ३० वर्षे रा.मु.पो. सुतार वाडी गांवठाण, सर्व्हे नं. ७९ पुणे. असे सांगुन के. के. मोटर्स नावाचे पावर हाऊस चौक रास्ता पेठ पुणे येथील दुकानासमोर, गाडी चोरी केल्याचे कबुली दिली तसेच आरोपी नाव सुबोजित राजेंद्र दास, वय २८ वर्ष, रा. रफिकभाई यांचे भंगार दुकानात, राजेवाडी, भवानीपेठ, पुणे मुळ पत्ता-राहणार-कोलु भागर, भद्रेश्वर जि. हुगळी, राज्य-पश्चिम बंगाल याने इनामदार चौक नाना पेठ पुणे येथुन दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. नमुद आरोपींना दि.२०/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

 

 

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परि-०१, पुणे शहर, श्री कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सपोफो/पागार, सपोफी/औचरे, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link