एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आंबेगाव पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

MCOCA (मोक्का) गुन्हयातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या छत्रपती संभाजीनगर येथुन आवळल्या मुसक्या,

आंबेगाव पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

आंबेगाव (कात्रज )भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंन ११९/२०२३ भा.द.वि.क. ३०७,३२३, १४३,१४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) म.पो. अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५, मोक्का अॅक्ट कलम ३ (१) (ii) ३(२) ३(४) प्रमाणे दाखल गुन्हयातील मागील दोन वर्षापासुन फरार असलेला आरोपी नाव नवाज निसार सय्यद हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोहवा चेतन गोरे व हणमंत मासाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहीती वरिष्ठांना कळवुन त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, राकेश टेकवडे असे दिनांक १७/०७/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जावुन मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन फरार आरोपी नाव नवाज निसार सय्यद याचा छत्रपती संभाजीनगर येथे शोध घेतला असता तो दिनांक १८/०७/२०२५ रोजी रात्री ०२:०० वाजता न्यु बायजीपुरा, मुसा चौक, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नवाज निसार सय्यद, वय २३ वर्षे, काम व्यवसाय, रा. नबी अण्णा लाईन संतोषनगर, कात्रज, पुणे मुळ रा. पाशा भाई यांच्याकडे भाडयाने, न्यू बायजीपुरा, मुसा चौक, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगुन वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. राहुल आवारे, सहा पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडल-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामते, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link