एरंडोल येथील विविध संघटनांतर्फे प्रविण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध
स्वप्निल पाटील एरंडोल प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा येथील विविध संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला.मराठा क्रांती मोर्चा,मराठा सेवा संघ,मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांतर्फे एरंडोल पोलीस प्रशासनाला सदर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना डॉ.सुरेश पाटील, शिवाजी अहिरराव, अतुल पाटील, अभिजित पाटील, राकेश पाटील,हिंमत पाटील,गुलाब पाटील, गजानन पाटील, नानाभाऊ पाटील,प्रा.रघुनाथ निकुंभ, रूपेश वाघ अजय पवार स्वप्निल सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्या प्रकरणी लोकशाही विरोधी, संविधान विरोधी, कडव्या व उजव्या जातीयवादी शक्तींचा हात आहे.त्यामुळे अशा सराईत गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येऊन त्यांना अटक करावी.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
