नागपूर पोलिस आयुक्त यांचे उल्लेखनीय कार्य
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
मा. श्री. रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला मदत कक्ष असावा अशा सूचना आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस ठाणे धंतोली येथे महिला मदत कक्ष (तुमचीसुरक्षा,आमची जबाबदारी )
(Women Help Desk YOUR SAFETY, OUR PRIORITY) नव्याने कार्यान्वित करण्यात आले. या कक्षामध्ये महिलांसाठी प्रशिक्षित महिला अधिकारी नियुक्त करण्यात आल्या आहेत, ज्या अत्यंत संवेदनशीलतेने महिलांच्या तक्रारी ऐकतात आणि योग्य ती मदत करतात.
महिला मदत कक्षाचे प्रमुख उद्देश:
• महिलांशी संबंधित तक्रारींवर तत्काळ आणि गंभीर दखल घेणे
• महिलांना कायदेशीर मार्गदर्शन व भावनिक आधार देणे
• लैंगिक अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसा यांसारख्या गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवणे
• महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे
“संवेदना, सुरक्षा आणि समर्थन” हेच या कक्षाचे मूलमंत्र आहे.
पोलिस प्रशासनाच्या या पुढाकारामुळे महिलांना पोलीस ठाण्यात अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळेल, जे गुन्हे कमी करण्यासही मोठी मदत करेल.
करिता माहितीस्तव सादर.
(अनामिका मिर्झापुरे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पो. ठाणे धंतोली नागपूर शहर
