वन्दे भारत लाईव्ह टिव्ही न्यूज पुणे जिल्हाप्रमुख, ऑल इंडिया असोसिएशन सदस्य विशाल अडागळे व त्यांच्या पत्नी यांची कार्यतप्तरता.
प्रतिनिधी रितेश सणस पुणे
पुणे :- 18 जुलै 25 रोजी रात्रीचे 11:30 वाजले होते एक महिला गुजरवाडी रोड कात्रज दत्तनगर येथेल एमबी बीएर शॉपीच्या पाठीमागे किराणा शॉपजवळ घरामध्ये नवीन भाडेतत्त्वावर राहण्यासाठी नऊ दिवसापूर्वी आलेल्या आहेत असे त्यांनी सांगितले त्यांची चावी हरवली होती. घरमालक गावी असल्याने मोबाईल स्विचऑफ होता एकट्याच दरवाजात उभ्या होत्या योगायोगाने अडागळे दांम्पत्य नातेवाईकांना सोडण्यासाठी आले असता हा प्रकार निदर्शनास आला.
सदर घटनेबाबत त्यांनी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज शी बोलताना पुढीलप्रमाणे माहिती दिली
सदर महिलेस एवढ्या रात्री मदतीची आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात आले व त्यांनी माझी चावी हरवली आहे लॉक तोडून द्या अशी मदत मागितली आजूबाजूकडून त्यांची ओळख न पटल्यामुळे करणार काय म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीचे पोलीस मार्शल मस्के यांना कॉल केला असता काही मिनिटांमध्ये कात्रज मार्शल म्हस्के व साळवे हे हजर झाले असता त्यांना सविस्तर प्रकार सांगितला त्यांची ओळख न पटल्यामुळे अनोळखी प्रॉपर्टीचे अनोळखी महिलासाठी लॉक तोडने योग्य नाही म्हणून शेवटी आम्ही त्यांना स्वःतच्या घरी घेऊन शेजारी असलेला एक रूम मधे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणार तोच त्यांना शंका आली की मी रिक्षातून उतरली तिथे तर पडली नसेल ना चावी, चावी शोधण्यासाठी गेले असता चावी तिथेच पडलेले होते यामध्ये जवळपास दीड तास गेला. रात्रीचा पावणे एक वाजताच्या आसपास चावी मिळाली आणि त्या ताईंना घर उघडून त्यांच्या घरामध्ये जाता आले तोपर्यंत मी विशाल अडागळे व माझ्या पत्नी मोहिनी अडागळे त्यांच्या सोबतच होतो शेवटी त्यांची मदत केली आणि आम्ही एक वाजता आमच्या घरी आलो.
रात्री अपरात्री एखादी व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांची शहानिशा करून मदत नक्कीच करावी हा माणुसकीचा धर्म कोणीही विसरू नये व मदत करत असताना प्रशासकीय सेवनच सहकार्य घेऊनच मदत करावी असेही आवर्जून पत्रकार विशाल अडागळे यांच्याकडून नमूद करण्यात आले.
