कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक कलुबर्मे यांची ओळख : डॉ. उद्धव शिंदे.
प्रतिनिधी सारंग महाजन.
स्नेहबंधतर्फे नूतन अपर पोलीस अधीक्षकांचा सत्कार
अहिल्यानगर – लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नूतन अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची ओळख आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
नूतन पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा डॉ. शिंदे यांनी सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. शिंदे म्हणाले, कलुबर्मे यापूर्वी लातूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रचे पोलीस अधीक्षक त्यानंतर श्रीरामपुर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या रुबाबदार, शैलीने गुन्हेगारीवर आळा घालतील असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
