लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष रुपेश भाऊ अवचार यांच्याकडून निवेदन देण्यात आले
मां जिलाधिकारी साहेब बुलढाणा
मार्फत उप विभागीय अधिकारी साहेब खामगांव
अर्जदार लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिला अध्यक्ष मां लहुश्री रूपेश भाऊ अवचार व सामाजिक कार्यकर्ते खामगांव जि बुलढाणा
विषय येत्या 1 आॅगस्त 2025 रोजी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बुलढाणा जिल्यांत सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहिर करने बाबत
महोदय आम्ही खालील सह्या करनार विनती पूर्वक अर्ज करतो कि गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्रातुन तसेच सर्व जिल्यांतुन निवेदनाद्वारे मा ना मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडवणीस साहेब यांना पाठपूरावे करूंन सुट्टी बाबत विनंती केलेली आहे तरी अद्याप पर्यत सुटी जाहिर झालेली नाही ज्यांच्या लेखणीने व बोलीने लाखो वंचित कष्टकरी शोषीत दलीतांना जगण्याचे नवे स्वप्ने दिले असे साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बुलढाणा जिल्यांत एक अनोखी सामाजिक चळवळ उभी राहत आहे येणार्या १आॅगस्ट २०२५ रोजी साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यांचा गंध समाजाच्या कणाकणात भिनलेला आहे त्यांची जयंती म्हणजेच समाज प्रबोधनाचा व सत्याचा लढ्याचा एक मोठा सोहळा आहे या दिवशी जिल्यातील शासकीय व नीमशासकीय अधिकारी कर्मचारी सुध्दा या कार्यक्रमात व जयंती मध्ये सहभागी व्हावेत म्हणून जिल्यात सार्वजनिक सुटी जाहिर करावी जिल्यातील जनतेसाठी व मातंग समाजासाठी हि केवळ सुटी नसुन सामाजीक परीवर्तनांच्या वीचारांचा दिला जाणारा मानाचा मुजरा आहे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सार्वजनिक सुटी मिळाली तर सर्व समाज बांधव व जनतेला नवी दिशा व आशा मिळेल तरी आपणास विनंती कि १ आॅगस्त २०२५ पासुन जिल्यात साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहिर करावी उपस्थित आकाश गायकवाड सागर अवसरमोल सचिन अवचार विठ्ठल आवळे गजानन साळवे अनिल शेलारकर गणेश चांदणे सुमीत हेलोडे व आदि समाज बांधव उपस्थित होते
