लहान चिमुकल्यांनी गुरु दक्षिणा म्हणून दिली अनोखी भेट.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
चिंचवड: गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु शिष्य यांचा अत्यन्त महत्वाचा दिवस म्हणूनच चिंचवड मधील स्वरत रंग क्लासेसचे विद्यार्थी व पालक यांनी एकत्र येऊन जे आपली संस्कृती जपण्याचे काम करत परिसरातील अनेक कलाकार घडवतात असे निस्वार्थी गुरु ,हार्मोनियम,तबला,बासरी वादक
विश्वनाथ झावरे यांना गायन,बासरी,हार्मोनियम,तबला अश्या विविध कला सादर करून एक वेगळी गुरुदक्षिणा देण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमास महावितरण समिती सदस्य,वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे तसेच वुई टुगेदर फाउंडेशनच्या सचिव आदर्श शिक्षिका मंगला – डोळे सपकाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दोन तासाच्या संगीत मैफिलीत उपस्थित सर्व तल्लीन होऊन गेले होते
मंगला डोळे -सपकाळे यांनी गुरु शिष्य यांच्यातील नात्याविषयी अत्यन्त मौलिक मनोगत व्यक्त केले
या वेळी विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मिता राणे यांनी सूत्रसंचालन केले.
