गुरुवर्य तुमच्या ज्ञानाचा प्रकाश
जीवनास नवा अर्थ देतो – डॉ. गणेश राऊत…
कोंढवे धावडे – गुरु पौर्णिमेनिमित्त संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कोंढवे धावडे येथील गुरुवर्यांना मुख्याध्यापक सचिनजी खेंगरे, जीवनजी झारे, पंकजजी हांडे, सुनीलजी पवार, अभिजीतजी राऊत, नटराजजी शिंदे, लक्ष्मीकांतजी मस्के या सर्वांना शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत (शिवबांचा छावा) महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय छावा संघटना संस्थापक / अध्यक्ष संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा परिषद सदस्य सौ. अनिताताई इंगळे व इन्स्पायरिंग कोचिंग क्लासेस चे संस्थापक पाटील सर यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी, शाल व गुलाबाचे फुल देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्या वतीने करण्यात आले होते
आपल्या आयुष्यात प्रथम गुरू आई वडील दुसरे गुरु म्हणजे शिक्षक जे आपल्या जीवनाला आकार देत ज्ञानाचा संपूर्ण घडा आपल्याला देऊन आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात ते गुरु कधी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीत म्हणूनच बोललं गेलं आहे
गुरु आहे सगळ्यात महान कारण गुरु देतात सगळ्यांनाच ज्ञान, अशा या ज्ञानरूपी गुरुवर यांना मान देऊन त्यांचा आदर करणे हीच त्यांची खरी योग्यता असे मत यावेळी शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश राऊत यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भाजप नेते उमेश भाऊ सर पाटील, शिवसैनिक अविनाश सरोदे, प्रशांतजी लांडगे विलास ढम, सायली ताई भोसले, श्रुतीताई मोहिरे, वं इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित मोहिरे सर यांनी केले..
तर आभार प्रदर्शन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रशांत महाजन यांनी केले
