ग्राहक पंचायत राज्यस्तरीय अधिवेशन – राज्याध्यक्ष- डॉ.विजय लाड
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील
(१४)( राज्यस्तरीय वृत्त विशेष ) धाराशिव येथे राज्य स्तरीय अधिवेशन घेण्यात येणार असुन ग्राहक कल्याण क्षेत्रात राज्यात मोलाची कामगिरी बजावत आलेल्या व ग्राहक तीर्थ स्व.बिंदू माधव जोशी ह्यांनी स्थापित केलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे राज्यस्तरीय अधिवेशनाचा लाभ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व निमंत्रितानी घ्यावा अस आवाहन ग्राहक पंचायतचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड ह्यांनी हिंगोली येथील पत्रकांर समवेत बोलताना केलं. दि.१९ व २० जुलै ला दोन दिवसीय भव्य अधिवेशन प्रथमच आयोजित करण्याचा बहुमान धाराशिव जिल्ह्याला मिळालं असून मराठवाड्यात आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात स्नेहमेळावा, चर्चासत्र ,प्रबोधन,तज्ञांचे मार्गदर्शन,प्रश्नोत्तरे संवाद उपक्रम,गुणवंत ,यशवंतांचां गौरव,सहभागी सर्वांना प्रमाणपत्र,ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवेची माहिती ,मनोगते,आढावा आणि भविष्यातील सेवा कार्याचे नियोजन आणि समारोपीय सोहळा आदी चां समावेश दोन दिवसीय अधिवेशनात करण्यात आला आहे असेही डॉ.लाड ह्यांनी सांगितलं.श्री गणेश मंगल कार्यालय सोलापूर धुळे हाय वे वर सांजा उड्डाण पूल जवळ धाराशिव येथील अधिवेशन साठी नोंदणी शुल्कासह प्रवेश असून ह्यासाठी धाराशिव जिल्हाध्यक्ष अजित बागडे ९७६३६३८७७०,जिल्हा सचिव आशिष बाबर,जिल्हा संघटक रविशंकर पिसे ह्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केलं.अधिवेशनात सहभागी होण्यासाठी समाज माध्यमा वर प्रसारित अधिकृत फॉर्म नोंदणी शुल्का सह भरून ऑनलाईन पाठवावा अस आवाहन ही त्यांनी केलं.राज्यातील सर्व विभागातील ग्राहक पंचायत महाराष्ट्र परिवारातील पदाधिकारी, सदस्य,कार्यकर्ते, आणि निमंत्रित ह्यात सहभागी होत असून प्रचंड असा प्रतिसाद व उत्साह धाराशिव येथील नियोजित राज्यस्तरीय अधिवेशना संदर्भात दिसत असल्याने आयोजकांचा उत्साह वृधिंगत होत असल्याच ग्राहक पंचायत चे राज्य महासचिव अरुण वाघमारे ह्यांनी म्हंटल आहे.अलीकडेच नांदेड येथे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या अभ्यास वर्गात दोन्ही जिल्ह्याचा समन्वय साधल्या गेल्याने उत्साह निर्माण झाल्याचे नांदेड चे जिल्हाध्यक्ष दीपक कासराळीकर,संघटक आनंद कृष्णापुरकर,हिंगोली चे जिल्हाध्यक्ष ॲड.आर.एन. अग्रवाल,सचिव परसराम हेंबाडे, प्रसिध्दी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी म्हंटल आहे.राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी धाराशिव जिल्हा शाखा विशेष परिश्रम घेत असल्या बद्दल त्यांचं कौतुक राज्याध्यक्ष डॉ.लाड ,राज्य सहसंघटक सौ.मेघाताई कुलकर्णी सचिव अरुण वाघमारे विभागीय संघटक इंजिनिअर लांडगे,आणि पदाधिकारी व सदस्यांनी केलं आहे
