खुन करुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस अटक.
भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
पुणे :दिनांक 01जुलै 2025 रोजी २२:४२ वा च्या सुमाराम वैष्णची बिल्डींग, एच.डी.एफ.सी एटीएम समोर, साइंसिष्टी चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे एका मुलास कोणीतरी चाकुने मारला आहे रक्त निघत आहे अशा आशयाचा कॉल एम.डी.टी डिवायसचर कॉल प्राप्त झाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलोस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी व इतर पोलीस अधिकारी, अंमल्दार यांनी घटनास्थळी शांत घेवुन घटनास्तरावर जखमी असलेल्या इसमास तात्काळ उपचाराकरता भारती हॉस्पीटलकडे पाठविले असता त्यांनी सदर इसमाची तपासणी करुन तो मयत झाल्याचे सांगितलं. सदर मयत इसमाची ओळख पटविली असता त्याचे नाव आर्यन ऊर्फ निखील अशोक सावळे, वय १९ वर्ष, रा. मुपों टेंगोडा, सटाना, जि. नाशिक असे असल्याचे समजले.
सदरची घटना गंभीर स्वरुपाची असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदार यांना मयत इसमास जिवे ठार मारणाऱ्या आरोपीचा शोध घेण्या बाबत योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांनी आरोपी नाव धैर्यशील ऊर्फ सचिन बळीराम मोरे, वय २३ वर्षे, रा. सुवर्णयुग नगर, तीन बत्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे हा आंबेगात पार चितामणी शाळेसमोरुन पळून जात असताना मिळून आला. त्यांनी त्यास ताब्यात घेवून मा. वरीष्ठांसमक्ष हजर केले. नमुद इसमाकडे अधिक तपास करता त्याने मयत इसम आर्यन ऊर्फ निखील अशोक नायळे यास कानाखाली मारल्याचे रागातून लोखंडी हत्याराने वार करुन जिवे ठार मारल्याचे सांगितले.
फिर्यादी नाव दिनेश अरुण बागुल, वय ३६ वर्षे, धंदा रिपेरींगचा व्यवशाय, रा. बी ६०२, सदगुरु दर्शन सोसायटी, साईनिध्दी चौक, आबेगाव पठार, पुणे यांनी त्यांचा भाचा आर्यन ऊर्फ निखील अशोक सावळे, वय १९ वर्षे, रा. मुपो ठेंगोडा, सटाना, जि. नाशिक ग्रास इसम नाव घेर्यशील ऊर्फ सचिन बळीराम मोरे, यय २३ वर्षे, रा. सुवर्णयुग नगर, तीन बत्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे लोखंडी धारधार हत्याराने वार करून जिवे ठार मारले म्हणून भारती विद्यापीठ पोलीन स्टेशन गुन्हा रजी. नंबर ३३३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम २०३ (१), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३० (१) (३) सह १३५ अन्यवे गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये नमुद आरोपीस अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त गो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस रुह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोड सतो, अपर पोलीन आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुगे, गा. मिलींद मोहीले साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आचारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रमेश चौधरी पोलीस अंमलदार नितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, मगेश गायकवाड, किरण साथळे, तुकाराम सुतार, संदीप भागळे, नागेश पिसाळ, मिलींद गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
