प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
प्राचार्य जगन्नाथ रासवे यांची “दैनिक युवक आधार” कार्यकारी संपादक पदावर नियुक्ती
अल्पावधीतच महाराष्ट्रभर आपल्या ठसा उमठवणाऱ्या “दैनिक युवक आधार” या लोकप्रिय दैनिकात एक महत्त्वाची जबाबदारी प्राचार्य जगन्नाथ रासवे सर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सरांची कार्यकारी संपादक पदावर निवड करण्यात आली असून, हे पद अत्यंत जबाबदारीचे व प्रभावी मानले जाते.
जगन्नाथ रासवे सर हे शिक्षण, समाजकारण आणि लेखन क्षेत्रात सक्रिय असून त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोन दैनिक युवक आधार च्या विकासात मोलाचा ठरेल, असा विश्वास संपादक व पदाधिकारी टीमने व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल संपादक व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
