डीवाइन जैन ग्रुप यांचे व्हीलचेअर सहकार्य.
मधु ताराचे दिव्यांगांच्या घरी जाऊन मोफत व्हीलचेअर भेट कार्य
संपादकीय
दिनांक 14 जुलै 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे.दिव्यांग राज्य अध्यक्षा निर्मलाताई चौधरी.ह.भ.प माऊली दादा चौधरी यांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भानोबाची कोयाळी येथे अपघातात दिव्यांगत्व आलेले दोन्ही पायांनी दिग्यांग असलेले श्री बाबुराव आल्हाट यांना त्यांच्या घरी जाऊन मोफत व्हीलचेअर भेट दिली.
ही व्हीलचेअर पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास अधिकारी आदरणीय रामदासजी चव्हाण साहेब यांनी मैत्रीपूर्ण भेट घडवून दिलेल्या देशभर सामाजिक कार्य करणाऱ्या डीवाइन जैन ग्रुप या संस्थेचे प्रमुख श्री संकेतजी शाह यांच्या सहकार्यामुळे घडली.
यावेळी मधु तारा प्रमुख यांनी डीवाइन जैन ग्रुपचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे व्हीलचेअर साठी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.कुठलेही कागदपत्र न मागता थेट घरी येऊन व्हीलचेअर मिळाल्यामुळे बाबुराव आल्हाट आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत मधु ताराच्या दिव्यांग अध्यक्षा निर्मलाताई चौधरी.मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे. डीवाइन जैन ग्रुपचे श्री संकेतजी शाह यांच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले.या वेळी श्री बाबुराव आल्हाट त्यांची पत्नी त्यांच्या मातोश्री आणि चिरंजीव उपस्थित होते.
देव तारी त्याला कोण मारी.
मधु तारा प्रत्येक दिव्यांगांच्या दारी असे दोन्ही पायांनी 86 टक्के दिव्यांग असलेल्या मधु ताराच्या दिव्यांगांच्या राज्य अध्यक्षा निर्मलाताई चौधरी म्हणाल्या.
