अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मानवत तालूक्यातील ४९ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहिर.
मानवत / प्रतिनिधी.
मा. जिल्हाधिकारी परभणी यांचे आदेशाप्रमाणे आज 14 .07. 2025 रोजी दुपारी बारा वाजता मानवत तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये मानवत तहसिलचे तहसिलदार मा.श्री पांडुरंगजी माचेवाड यांचे अध्यक्षतेखाली मानवत तालुक्यातील सर्व 49 ग्राम पंचायतच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 30 साठीचे आरक्षण प्रक्रिया पाडण्यात आली.
यावेळी कार्यालयातील निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार मा. जिवन धारासूरकर, नायब तहसीलदार महसूल एक मा. संजयजी खिल्लारे, सहाय्यक महसूल अधिकारी संतोष वायकोस , ऑपरेटर राहुल खाडे व बापू रासवे यांनी आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार यांना मोलाचे सहकार्य केले.
यावेळी मानवत तालुक्यातील बहुसंख्येने नागरिक, लोक प्रतिनिधी हजर होते. सदरील सरपंच आरक्षण प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधी सह पत्रकार , सामाजीक समाज सेवक व तालूक्यातील नागरिकांनी सहकार्य केले.
