बुलढाण्याचे अमोल गायकवाड नवे अँडिशनल एसपी अखेर पदभार स्वीकारला…!! बी.बी. महामुनी यांची रत्नागिरीला बदली..!!
सौ. कलावती गवळी ( बुलढाणा जिल्हा ) प्रतिनिधी.
महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ स्तरांवर मोठी खांदेपालट झाली असून. राज्यभरांतील एकूण 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फेरबदल महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पुणे मुंबई नागपूरचा अनेक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या शिवाय नागपूर कोल्हापूर लातूर यवतमाळ नाशिक बुलढाणा आणि छ. संभाजीनगर यासारख्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांची रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बी.बी महामुनी बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यरत असताना नेहमीच प्रयत्नशील ठरले, महामुनी यांच्या बदलीमुळे बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक पद हे रिक्त होते.
अखेर त्यांच्या रिक्त जागेवर अमोल गायकवाड यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून. त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात एक महत्त्वांचा दुवा अनुपस्थित होता आता अमोल गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे ही पोकळी भरून निघाली आहे. मावळते अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या,*
