अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्वर्गीय, वसंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे मान्यवरांना प्रधान,
स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांनी समाजामध्ये केलेले योगदान प्रेरणादायी,( माजी आमदार उल्हासदादा पवार,)
माजी खासदार स्व वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त वसंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार मेहतर वाल्मिकी समाजातील सामाजिक धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, डॉक्टर, वकील, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांना माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी माजी आमदार उल्हास दादा पवार म्हणाले स्व खासदार वसंतरावजी चव्हाण यांनी समाजामध्ये गोरगरीब नागरिकांसाठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेले भरीव योगदान हे प्रेरणादायी आहे असे यावेळी म्हणाले,
लोहिया नगर फायर ब्रिगेड जवळ पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनामध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला,
यावेळी माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, बाळासाहेब अटल, धनराज बिदाॅ, सचिन मथुरावाला, करन मकवाणी, रवी परदेशी, संदीप लडकत, सतीश लालबिगे, तसेच विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त नरोत्तम चव्हाण, कनव वसंतराव चव्हाण, बंडू चरण, सिद्धांत सारवान, प्रमोद निनारिया, यांच्यासह समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविराज संघेलिया व कुणाल करोते यांनी केले,
