हिंगोली जिल्ह्यातील हळद पिक उत्पादक शेतकऱ्यांनी जिआय मानांकणासाठी प्रयत्नशिल रहावे.जिल्हा विकास अधिकारी -लहाने
प्रतिनिधी :श्रीहरी अंभोरे पाटील
वसमत:हिंगोली जिल्ह्यातील हळद पिक उत्पादक शेतकर्यानी जिआयमानाकन साठी प्रयत्नशील राहावे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद पिकाची सातबारावर नोंद करून वसमत हळद जीआय अधिकृत नामांकन चा वापर करता बनावे जिल्हा विकास आधीकारी अविनाश लहाने जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड हिंगोली यांनी आज१२जुलै रोजी झालेल्या सुर्या फार्मरप्रोडुसर कंपनी सातेफळ येथील झालेल्या मार्गदर्शन आढावा कमिटीच्या बैठकीत त्यांनी बोलताना सांगितले हिंगोली जिल्हाची भारताच्या नकाशावर हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे व संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद उत्पादक शेतकरी असुन त्यानुसार हिंगोली व वसमत हे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बाजार पेठ आहे ऑनलाइन बाजार पेठ म्हणून महाराष्ट्र राज्यातील पहिली वसमत कृषी उत्पन बाजार समितीची ओळख आहे यातच वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात हळद उत्पादक शेतकरी असुन या शेतकर्यानी वसमत हळद जीआय मानांकन मिळवले पाहिजे असे आज आढावा व मार्गदर्शन करताना नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्री. अविनाश लहाने यांच्या अध्यक्षतेखाली सूर्या फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड च्या वसमत परभणी रोड तेलगाव येथील हळद प्रक्रिया युनिटच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या मार्गदशन बैठकीत बोलताना सांगितले सुरुवातीस सूर्या फार्मर्स प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड यांनी नाबार्डचे सहकार्याने जीआय मानांकन स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून मिळाले. हे मानांकन मिळण्यासाठी नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व कुरुंदकर फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या व पुढे स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र वसमत चे माध्यमातून दि.20आक्टोबर 2021 ते दि.30मार्च 2024 प्रयत्न केल्यामुळे मिळाले पण जीआय मिळाल्यानंतर जीआय चा अधिकृत वापर करता यावा म्हणून शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नाबार्डने सूर्या फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून एक हजार शेतकऱ्यांना अधिकृत वापर करता प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मंजूर केला आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड यांच्या अध्यक्षतेखाली जीआय कामकाज आढावा व मार्गदर्शन कमिटीची स्थापना केली आहे. कमिटीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये जी आय चा अधिकृत वापर करून वसमत हळद हा लोगो पॅकिंगचा वापरून व ब्रॅण्डिंग करून जगाच्या बाजारात हळद विकण्यासाठी सुरुवातीस शेतकऱ्यांनी आपल्या हळदीचा ई पीक पाहणी माध्यमातून सातबारा नोंद करावी व सातबाराला हळदीची नोंद आल्यानंतर ती सातबारा व शेतकऱ्याचे केवायसी कागदपत्र मोबाईल नंबर व दहा रुपये नोंदणी फीस सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे देऊन नोंदणी करावी व प्रमाणपत्र मिळवावे. शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी, जीआय टॅग चा वापर करावा व बाजारात मालाला योग्य असा चांगला भाव मिळवण्यासाठी जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड हिंगोली यांच्या माध्यमातून व सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा, हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमतच्या माध्यमातून करण्यात आले.
