अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा तसेच देश सेवा करण्याची संधी समजून आपले कर्तव्य पार पाडावे आणि त्यामध्ये यशस्वी व्हावे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
१६ व्या रोजगार मेळ्याअंतर्गत नागपूरमध्ये १४८ नवनियुक्तांना नियुक्तीपत्राचे गडकरींच्या हस्ते वितरण
नागपूर 12 जुलै 2025
आपण अभ्यास करून शासकीय नोकरीमध्ये रुजू होतो. शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा तसेच देश सेवा करण्याची संधी समजून आपले कर्तव्य पार पाडावे आणि त्यामध्ये यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात केले.
16 व्या रोजगार मेळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील ४७ शहरांमध्ये एकाच वेळी झाले. याच श्रुंखलेत नागपूरच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीने उत्तर नागपूर येथील मंगल मंडप येथे रेल्वे, पोस्ट, संरक्षण, आरोग्य या केंद्र शासनाच्या विभागात निवड झालेल्या एकूण 148 उमेदवारांना नियुक्ती पत्राच वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नवनियुक्तांना संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता उपस्थित होते .
