विठ्ठल सोनुने चेअरमन तर राजेश दामधर व्हाईस चेअरमन पदी बिन विरोध निवड
संपादकीय
जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु येथील आर्यादिदि ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भारज बु या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या पंधरा दिवसापूर्वी बिनविरोध पार पडली होती त्यामध्ये विठ्ठल जयराम सोनुने , राजेश दौलतराव दामधर , गजानन लक्ष्मण बेराड , संजय रामचंद्र बेराड , साबीरखाँ मोहमदखाँ पठाण , गणेश भास्कर सोनुने , भास्कर जयराम सोनुने , रामकिसन विठोबा तारू , मंगला रमेश गायकवाड, उषा विठ्ठल सोनुने हे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आलेले आहे. सहकार विभागाच्या प्रणाली नुसार पंधरा दिवसानंतर संचालक मंडळातुन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडायचे असतात त्या अनुशंगाने वरिल सर्व संचालक मंडळाने कुशल आणि सर्वगुण संपन्न असलेले तरुण – तड़फदार नेर्तृत्व म्हणून चेअरमन पदी विठ्ठल जयराम सोनुने तर व्हाईस चेअरमन पदी राजेश दौलतराव दामधर यांची स्वखुषीने , आनंदाने आणि एकमताने निवड केली आहे . या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आणि चेअरमन , व्हाईस चेअरमन यांचे भारज व परिसरात अभिनंदन होत आहे यावेळी विदेशात जॉबला असलेला तरुण मनोहर उबाळे , शाखा – व्यवस्थापक गोपाल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सिताराम वाघ , किर्तनकार ह.भ.प.बंडू महाराज महानोर , सामाजिक कार्यकर्ते राजु डब्बे इत्यादी उपस्थित होते.
