कर्तव्यदक्ष मंगेश चव्हाण यांनी लातूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून स्वागत
स्नेहल तांबोळी ( लातूर जिल्हा ) प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रांत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला अजूनही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, यामध्ये राज्य गृह विभागाने मागील दोन दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या देखील बदल्या केल्या आहेत. लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांची धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली असून. त्यांच्या रिक्त जागेवर मंगेश चव्हाण यांची लातूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आपला पदभार स्वीकारला.
यावेळी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. तर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी लातूर जिल्ह्यात पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासमवेत प्रयत्नशील राहिले, तर नव्याने रुजू झालेले मंगेश चव्हाण हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी लातूर शहर पोलीस उपअधीक्षक पदी कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. पुढील काळातही लातूरची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे
