शिरपूर येथील युवा उद्योजक सतीश शेळके यांचा “स्वप्न कथा फोटो & फिल्म्स “चा जयश्रीताई सुनील शेळके शिवसेना प्रवक्ता (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या हस्ते शुभारंभ.
प्रतिनिधी सारंग महाजन.
दिवसेंदिवस नवतरुण नोकरी च्या मागे न पळता उद्योगास प्राधान्य देऊन भविष्यात यशस्वी वाटचाल करीत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. असे धाडस शिरपूर येथील सतीश शेळके करीत आहे. उद्योगांमध्ये तो यशस्वी होत आहे.
सतीश गजानन शेळके यांच्या फोटोग्राफीचा शुभारंभ सोहळा आज चिखली येथे जयश्रीताई शेळके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी मा. आ. राहुल भाऊ बोंद्रे ,युवा सेना नंदूभाऊ कऱ्हाडे, चिखली तालुका महिला आघाडी संघटिका ॲड. रूपालीताई चौधरी, शिवसेना उपशहर प्रमुख रविभाऊ पेटकर, युवा सेना उपशहरप्रमुख शंभूभाऊ गाडेकर, युवा सेना समन्वय अनिलभाऊ जावरे, साजिद भाई, नारायणभाऊ वाणी व इतरमंडळी उपस्थित होती . सतीशने वयाच्या 18 व्या वर्षी एका सेकंड हॅड कॅमेऱ्यापासून फोटोग्राफीची सुरुवात केली होती आज त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर चिखलीमध्ये एक सर्वात लहान वयाचा यशस्वी फोटोग्राफर म्हणून नावलौकिक केलं आहे सोबतच एम एस सी मायक्रोबायोलॉजी देखील करत आहे. उच्च शिक्षण घेत असताना आपली आवड जोपासत त्या आवडीचे रूपांतर चांगल्या व्यवसायात सतीश ने केले आहे. सतीश ला व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
