शहापुरात पालकांसाठी ठिय्या विधानसभेतही उमटले पडसाद
पाच आरोपींना तात्काळ पोलीस कोठडी:- रूपाली चाकणक
सौ. स्नेहल तांबोळी प्रतिनिधी. शहापूर तालुक्यांतील सावरोली येथील आर. एस. दामिनी या शाळेत विद्यार्थीनींवर करण्यात आलेला अपमानजनक व अमानवी कृत्यानंतर राज्यांत चांगलीच संतापाची लाट उसळली होती. मासिक पाळीच्या संदर्भात मुख्याध्यापिकेने सर्व मुलींची जबरदस्तींने शारीरिक तपासणी केल्याचा गंभीर प्रकरणाची त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेवुन गुरुवारी प्रत्यक्ष शहापुरांमध्ये भेट देवुन पालक व पोलीस व शिक्षण विभागासमवेत सर्व घडामोडींचा आढावा राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी आढावा घेतला. राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या… की शाळेची मान्यता रद्द होणे, आवश्यक असले, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची पूर्णता काळजी घेतली जाईल शाळेच्या जागेचा वापर करत सोमवारपासूनच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या शैक्षणिक व्यवस्था सुरू करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
