जीवन ज्योती महिला सशक्तीकरण केंद्रात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
संपादक संतोष लांडे
भोर : जीवन ज्योती महिला सशक्तीकरण केंद्रात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने पार पडला. या विशेष प्रसंगी STL कंपनीच्या मुख्य मानवी संसाधन अधिकारी अंजली बायस आणि CSR मॅनेजर मा. मनिष तायडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमात केंद्रातील सर्व विद्यार्थिनी आणि कर्मचारी सदस्यांनी सहभाग घेत गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले, जे उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.
विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांप्रती प्रेम व आदर व्यक्त करत त्यांचे मार्गदर्शन किती मोलाचे आहे, हे आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरूपौर्णिमेचे खरे महत्त्व – आपल्या आयुष्यातील गुरूंना मान देणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे स्मरण करणे – अत्यंत सुंदर रीतीने अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल ठोंबरे (केंद्रप्रमुख) यांनी संपूर्ण आयोजनाची जबाबदारी घेतली होती. रोहिणी भगत यांनी अंजली मॅडम यांचे स्वागत केले. सुवर्णा चोरगे यांनी सुंदर सूत्रसंचालन केले, तर क्षितिजा साळुंखे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करत सर्व घटना सुरळीत पार पाडल्या.
हा कार्यक्रम केंद्राच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडला आणि उपस्थितांच्या मनात एक संस्मरणीय अनुभव निर्माण करून गेला.
गुरूपौर्णिमा म्हणजे केवळ पूजनाचा दिवस नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरूंच्या मार्गदर्शनाचे स्थान किती मोलाचे आहे, हे जाणून त्यांना आदराने नमवण्याचा दिवस आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण करतात,” — अंजली बायस,मानवी संसाधना आधिकारी
